Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 27 मे, 2007

हायकू

सहन होत नाही
कूणाचं झाडाखाली बसणं
झाडासकट उन्मळून पडणं

झाडाखालच्या आठवणींनी
मनात प्रवेश केला अन
झाडावरचा कावळा घान करुन गेला.

पाउस कधीच थांबलाय
ठींबकताहेत आठवणी
भिजलेल्या झाडातून.

 तसं काहीच झालं नाही
आठवणींचा पांढरा ढग आला.
सरकत सरकत निघून गेला..


प्रतिसाद

  1. sundar


Leave a response

Your response:

प्रवर्ग