डोंगरांना बाजूला सरकवून
जेव्हा सुर्य वर येईल,
तेव्हा तु समोरी जा
हातात रानफुले घेऊन
तेव्हा मीही
धबधबता कोसळणारा
प्रवाह होईल, तुझ्या
मना-मनातुन वाहणारा
अन्
दुरवर माणसांच्या जंगलात
तुझीही एक हाक पेरुन ठेव
वाढणार्या झुडंपाबरोबर
मीही उगवेन ह्ळूहळू .
Lovely, liked a lot !
By: वाचून बघा on 6 जुलै, 2008
at 5:34 PM