Posted by: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे | 21 April, 2008

गझल

कुठेतरी कुणाचे अस्पष्ट नाव आहे,
आता मी सोसला, तो खोल घाव आहे

तेव्हा मुकीच होते, आता मुकीच आहे
आता मुकेपणाचा झाला, सराव आहे

जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले
आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे

बोललेच नाही, माझ्या व्यथा कुणाला
सोसून सर्व घेणे, माझा स्वभाव आहे

आम्ही येथे भुकेले, तेही तिथे उपाशी
प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे.

गावात आम्ही हरलोच बाजी
सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे. 

पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या
सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे.

Responses

आपल्या कविता छान आहेत. मला आवडल्या. मी नेहमी आपल्या कविता वाचतो.

khup sundar gazal aahe

आपली कविता सुंदरच आहे
सामंत

आपला भाषेसंबधी लेख सापडात नाहीय. मला या विषयात खुप उत्सुकता आहे

आमच्याकडून लेख प्रकाशित करण्याबाबत काही तांत्रिक चूक झाली. त्यामुळे लेख दिसत नसावा.
( आपल्या प्रतिसादामुळेच आम्ही पुन्हा त्यात लक्ष घातले. नाहीतर आम्ही लेखन प्रकाशित झाले. असे समजून मोकळे झाले होतो. :) )

आपली प्रतिक्रिया आमचा लेखनाचा उत्साह वाढवते. आपले मनापासून आभार !!!

gazal aavaDalee !

Leave a response

Your response:

Categories