प्रयत्नही करुनही जमत नाही कविता
तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप
माझ्या अहंकाराला डिवचतो.
ही अस्वस्थता कोसळत जाते,
तिन्ही सांजेला. .
धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन
कवितेला बिलगुन चालतांना
कोणताच विचार मला सुचत नाही.
ऐनिलिसिस करता येत नाही
गुदमरलेल्या श्वासांचा.
आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते
“आभाळ भरुन आल्यावर
मी डोकावून पाहतो,
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात
दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत,
माझी कविता एकाकी असते” …. Superb !
By: वाचून बघा on 5 ऑगस्ट, 2008
at 6:35 PM
धन्यवाद !
प्रतिक्रियेबद्दल आभारी !!!
By: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे on 6 ऑगस्ट, 2008
at 2:42 PM
athavani ya asha astat ki jya athavyacha
astat karan sukh dukhat pratham tyach athavtat
By: Shailaja on 29 सप्टेंबर, 2008
at 10:18 AM
आपल्या मताशी अगदी सहमत.
By: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे on 29 सप्टेंबर, 2008
at 5:30 PM
सुंदर .
By: आशा जोगळेकर on 19 ऑक्टोबर , 2008
at 2:42 AM
धन्यवाद !!! प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी.
By: प्रा.डॊ.दिलीप बिरुटे on 19 ऑक्टोबर , 2008
at 3:05 PM
mala khoop aawadali
By: poonam on 12 मे, 2009
at 7:49 AM