संवेदना.... ! » ललित

एक संवाद !
सर, नमस्कार ! ओळखलं का ?

असे म्हटल्याबरोबर..मनातल्या मनात कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. पण याचे कपडे काही कर्दमलेले वगैरे नव्हते. अगदी टापटीप होता.त्यामुळे मी जरा स्वत:शीच ओशाळलो.

आम्ही नेहमीप्रमाणे एसटी स्टँडवर एस्टीची वाट पाहात होतो. गजबजलेल्या स्टँडवर लोकांची ये-जा चाललेली होती. आणि माझ्या समोर एक तरुण त्याच्या पत्नी सोबत उभा होता. मी त्याच्या चेह-याकडे पाहिले, ओळखीचे कोणतेच चिन्ह त्याच्यात दिसत नव्हते. पण नेहमीचे गुळगुळीत वाक्य फेकुन दिले.

पूर्वी भेट झाल्यासारखी वाटते ! पण नेमके सांगता येईना आपण कुठे भेटलो ते!

सर, तुमच्या लक्षात कसे राहील? किती तरी विद्यार्थ्यात एक चेहरा लक्षात ठेवायचा, म्हणजे जरा अवघड काम आहे.

खरं तर दोन तीन वर्षाच्या सहवासात विद्यार्थी लक्षात राहतो. पण याला प्रयत्न करुनही मला आठवता येईना.कोणत्या वर्गाचा असेल.कोणत्या वर्षी शिकला असेल. खूप स्वत:ला ताण देऊन पाहिला पण काही जमेना.

सर, ही माझी पत्नी !(एकमेकांना नमस्कार झाला)

नुकतीच डीएड झाली आहे. एका विनाअनुदानित शाळेत गेल्या सहा महिन्यापासून नोकरी करतेय.

पगार नियमित होतो का ?

सर,पगार दिल्यानंतर अर्धा पगार पुन्हा संस्थेला द्यावा लागतो.

अरेरे ! मग दुसरीकडे प्रयत्न करायचा. सध्या डीएड झालेले आणि पोलिसांत भरती होणा-यांना शासकीय नोक-यांची काही कमी नाही.

तसेही,विनाअनुदानित शाळेत नोकरी करण्यापेक्षा किराणा दुकान टाकलेलं बरं ! असा एक विचार मी मनातल्या मनात गिळला.

तुम्ही काय करता ?..मी त्या तरुणाला विचारलं

सर, मी एमए.झालोय, इतिहास विषयात. नेट-सेटची प्राध्यापकाची पात्रता परिक्षा देत आहे. आतापर्यंत दोनदा परिक्षा दिली,

पण पास काही होईना. माझ्या मागचे, पुढचे,बाजूचे पास होतात. पण माझ्याच बाबतीत दुर्दैव आडवं येतंय !

अरे,नेट-सेट्चा अभ्यासक्रम तसा अवघड आहे. काही विषयात तर शुन्य टक्के निकाल आहे. तेव्हा प्रयत्न करत राहावे.

प्रयत्न तर चालूच आहेत सर ! गावाकडची शेती विकून बीएडला डोनेशन देऊन प्रवेश घेतला.

वर्षभर हमालासारखे राबराब राबलो,स्कॉलरशिप संस्थाचालकांनी ढापली.

हं ! शिक्षण संस्था चालकांनी काही ठिकाणी बाजार मांडला आहे.पण परिस्थिती बदलेल असा विचार केला पाहिजे.

कशाची परिस्थिती बदलते सर, माझेच पहा. शिक्षणासाठी शेती विकली. अभ्यासही केला.

बीएडची परिक्षा देत होतो, तर..

तर काय ?

ज्या परिक्षा केंद्रावर परिक्षा देत होतो, त्या बीएडच्या एका पेपरला जरा एका मुद्यावर अडलो.

खिशातून काही चिठ्ठ्या काढायला आणि आपण माझी कॉपी पकडायला एकच वेळ झाला.

अरेरे !पण कॉपी करायची नाही ना !

खरंय सर, पण पन्नास टक्के विद्यार्थी कॉप्या करुन पास होतात..तीस टक्के मुले कॉप्या घेऊन येतात पण त्यांच्यात कॉप्या काढायची हिम्मत होत नाही. वीस टक्के मुले अभ्यास करुन लिहितात.

तुम्ही कोणत्या कॅटेगीरीत येता ?.. मी मिश्कीलपणे म्हणालो.

सर, मी तीस टक्क्यामधे येतो. आपण माझी कॉपी पकडली आणि माझे सर्व विषयांचे गुण रद्द करण्याची शिफारस विद्यापीठाकडे केली आणि माझ्या एका महत्वाच्या वर्षाबरोबर माझे सर्व भविष्याचे स्वप्न हवेत विरुन गेले.

ते कसं काय बॉ?

बीएड झाल्याबरोबर मला ज्युनियर कॉलेजमधे नोकरी लागणार होती. नातेवाईकाच्या एका संस्थेत चार लाख रुपये भरले होते. पदाची जाहिरात दिलेली असल्यामुळे त्यांनी दुसरा उमेदवार घेतला आणि माझे पैसे..त्यांच्याकडेच राहिले.

अरे, मिळतील ना पैसे. नातेवाईक आहेत म्हटल्यावर तुझे पैसे कुठे जाणार?

संस्थाचालक पैसे परत देत आहेत. पण दहा हजार, वीस हजार, असे करुन देत आहेत. तेही तगादा केल्यावर .

काय करावे या संस्थाचालकांचे काही कळत नाही…. मी

सर, माझं तुमच्याकडं फारसं मागणं नाही. असाच प्रसंग भविष्यात कोणाबरोबर घडला तर त्याला त्याची परिस्थिती विचारा,आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याचा प्रामाणिकपणा पडताळून पाहा.आणि जमल्यास त्याला माफ करा.

माझ्यासारखा एखादा तग धरतो,पण एखादा आयुष्यातून उठून जाईल.पाहा जमलेच तर….

इथे त्याचे डोळे भरतील असे वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. कोणत्या आत्मविश्वासाने तो असा बोलत होता. मला कळलेच नाही. आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडेही नव्हते. मी काय बोलावे असा विचार करत होतो, तेवढ्यात त्याची एसटी आली. त्यांची धावपळ सुरु झाली. तरी तो बोलत होता

सर, पुन्हा परिक्षेला येणार आहे. तुमच्या शुभेच्छांबरोबर, जमलेच तर मला थेट मदत करा.

असे म्हणून तो माझ्यासमोरुन बसमधे बसण्यासाठी निघूनही गेला.

मी मात्र जागच्या जागी थिजून गेलो होतो. इथे कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणावे, असा प्रश्न मला पडला होता.

अरे पावसा पावसा, तु आहेस तरी कुठं !!!
आभाळ भरुन येतंय, पण पावसाच पत्ताच नाही. १९३६, १९७२, आणि आता २००८ म्हणजे बरोबर छत्त्तीस वर्षानंतर आता पाऊस पडणारच नाही, भयंकर दुष्काळ पडणार आहे, अशी भविष्यवाणी आमच्या एका दोस्ताने केली. आणि पुन्हा आम्ही कवितेच्या पुस्तकात घुसलो. कविता वाचता…वाचता…….कवितेच्या शब्दा-शब्दावरुन. लिंकवर क्लिक केल्यावर जसे इतर दूवे उघडतात तसे मनाचे अनेक दुवे उघडत गेले ….दररोज, कडाक्याचे ऊन पडत असल्याने पावसाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. केवळ शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही पावसाने डोळे वटारल्याने हवालदिल झाला आहे. आषाढीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारकरी एकदा परतला की तो पाऊस घेऊन येतो असा एक समज आहे. बाजरी, मका, मुग, कापूस, तूर, यांची पेरणी झालेली असली की दोन पानांची रोपं पांडुरंगासारखी कर कटेवर ठेवून डोलत असतात. पण यंदा वारक-याला दर्शन करुन आला तरी त्याची नजर आभाळाकडेच. शेतक-याने खरिपाच्या पिकाची आशा सोडली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन तरी पाऊस यावा इतकीच अपेक्षा उरली आहे. खरे तर य काळात रानं हिरवीगार झालेली असतात. डोंगरद-यातून खळखळत वाहणारे पाणी, गावा-गावातील अध्यात्मिक वातावरण आणि येणा-या सनासुदींमुळे वातावरण भारलेले असते. आणि आम्हाला पावसाच्या कवितेची आठवण होते, बहिणाबाई म्हणतात…

आला पह्यला पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीची परमय

माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी….!!!

बहिणाबाईच्या कवितेतला पाऊस असा भरपूर कोसळणारा. धरित्रीचं मन ओला करणारा असा पाऊस, शिवार गच्च करणारा पाऊस, नदी नाले तुडूंब भरणारा पाऊस. पण यंदा काही त्याचे लक्षणे नीट दिसत नाही. जमीन आणि आकाशाची भेट म्हणजे जीवा-शिवाची भेट. दोघांच्या भेटीने दरवळणा-या मृदगंधाने प्रत्येकाच्या आनंदाला उधान येतं. मात्र दुष्काळामुळे भूईचेच दु:ख पेटले आहे. ते कोणीतरी विझवायला पाहिजे अशी हाक कवितेतून येत आहे. एक अज्ञात कवी म्हणतो.

ढग पांगले पांगले, हाक पावसाला द्या रे

दु:ख पेटले भुईचे, कुणी विझवाया या रे

ढगांचा पांगण्यामुळे धरित्रीचे दु:ख पेटले आहे, आणि ते दुखः केवळ पावसानेच विझणार  आहे. पावासाच्या शोधात असलेला शेतक-याला वेड लागण्याची वेळ आली आहे. बेभानपणे पडणारा पाऊस दूर कुठेतरी गेलेला आहे. आणि त्याची परिणीती दु;खात होते. दिवसभर लागणारी झड, दिवस-दिवस चालत असायची, ‘आता थांब रे बाबा, अशी विनवणी करण्याची वेळ आणणारा पाऊस हरवला आहे. डोहांच्या काठावर नाचणारा मोर, मना-मनातून वाहणारे पावसाचे झरे, झाडांनी अलगद टिपून घेतलेले पावसाचे थेंब, मोहरुन लाजणारे वृक्ष, काळेभोर झालेले आकाश….हे सारं स्वप्नवत वाटत आहे. सरकारने दिलेल्या पॅकेजचे पैसे, खतासाठी, बियाणांसाठी, दिले याचा विसर होऊन शेतकरी अवांतर खर्च करतोय, नवी कोरी टू-व्हीलर, घेऊन मोबाईलवर हॅलो, हॅलो, करतोय. आणि न पुरणारे पैसे संपल्यावर पुन्हा तेच दु:ख. पाण्याच्या शोधात किडे-किरकुडे शहराकडे येताहेत, रानात चारा नसल्यामुळे जणावरांचे हाल पाहवत नाही. भविष्याच्या चिंतेने मुक्या धनाला बाजाराच्या दावणीला बांधले जात आहेत.

ना.धो. महानोर म्हणतात-

पांगलेला पावसाळा, वाट भरलेली धुळीने

मोडक्या फांदीस घरटे, वाळलेली शुष्क पाने.

दूर गेल्या पायवाटा डोंगराच्या पायथ्याशी

पंख मिटल्या झोपड्यांचे दु:ख कवटाळे उराशी.

पांगलेल्या पावसाने मोडकी फांदी, वाळली पाने, दूर गेलेल्या पायवाटा आणि दु़ख; पुजलेलेच. जिथे पाण्यासाठी उन्हाला व्याकूळ होण्याची वेळ आली तिथे जीवाचे काय हाल. पावसाअभावी जीव भीतीने कासावीस झाल्याशिवाय राहत नाही.

पाऊस आलाच नाही तर…….पक्षांचे थवे मरणाचा निरोप देत इतरत्र जातील. घरातील कर्ता माणूस कुठे निघून जाईल त्याची भीती कुटूंबाला लागून राहीली आहे. आणि असा विचार करता करता माय माऊलीच्या डोळ्यांचा कडा ओलावतात. पक्षी नुसते हिरमुसले होऊन वाळलेल्या पानांकडे पाहत आहेत.सुस्तावलेल्या झाडाला ओल नाही. आणि शेतक-याच्या दुखःला कुठेच तळ नाही. पावसाचा गार झोंबणारा असा गारवा नाही. कुठे बगळ्यांचा थवा शेतात नाही. आणि पुन्हा पहिल्या पावसाची आठवण होते. मंगेश पाडगावकर म्हणतात….

पहिला पाऊस येतो आधी

आजीच्या पाठीवरच्या घामोळ्यांवर

बाजूला मी उभा भिजत,

माझा मलमलाचा इवलासा सदरा ओलाचिंब.

झाडाच्या हिरव्या गाई तहानलेल्या

पहिल्या पावसात पानांनी शहारत

उचलतात डो़ई वर, झेलतात सरी.

आपल्यालाही आठवत जातात पहिल्या पावसात ओलेचिंब झालेले आपण. घरात झटकून धुळ झटकावून काढलेल्या छत्र्या, रेनकोट, आणि आपल्याला आठवतात गोणपाटाचा केलेला रेनकोट. पोत्याचा कोपरा मुडपून भिजत चाललेले आजोबा. चिंब झालेले रान. यातले आता काहीच नसते. सा-या वाटा, वळणं मागे टाकून आयुष्य असं कधी उजाड माळरानावर येऊन विचार करायला लावते. पाणी ग्लासात ओतून प्यायला द्यावे, तसे रोपट्यांना ग्लासाने पाणी ओतणा-या स्त्रीयांना पाहिलं की आमच्या -दयात कालवाकालव होते. तेव्हा सोबतीला केवळ भन्नाट वारा असतो. पाण्यासाठी हरवलेल्या दाही दिशा, आणि डोळ्यात पूर, तेव्हा काय करावे काहीच समजत नाही. पावसळ्यात मस्त भटकंती करुन यावे असा विचार पक्का झालेला असतो…..पावसाळी दिवसात कुठे तरी घाटात भटकून यावे, प्रवास व्हावा, सुरेल पावसाच्या धारेत आपला सुर मिसळून आपल्याच गाण्यावर खू्श व्हावे. आणि पुन्हा एकदा बालकवीची कविता वाचायला हवी असा विचार तरळून जातो. विंदा म्हणतात….

वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे;

रक्तामधल्या प्रश्नांसाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे.

असाही एक विचार मनात डोकावतोच….तक्रार करावी तर कोणाकडे करावी. दरवळणारा मातीचा सुवास येत नाही. माणसाला माणूसपण देणार्‍या मातीला भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी ढेकळं अजून विरघळली नाहीत. शेती जीवनाला आकार देणारा पाऊस पडावा यासाठी परमेश्वराची आठवण होत आहे. सर्व भेदाभेद दूर होऊन. धोंडी-धोंडी पाणी दे असा आवाज गावात घुमतोय. निसर्ग हाच देव त्याच्या भेटीची ओढ तीव्र होत आहे, बहिणाबाई म्हणताहेत……..

येता पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी

आता खा रे वडे भजे

घरांमधी बसा दडी

देवा, पाऊस पाऊस

तुझ्या डोयातले आंस

दैवा, तुझा रे हारास

जीवा, तुझी रे मिरास.

आता भरपूर पाऊस होऊ दे !!! अजून दोन महिने शिल्लक आहेत. चांगला गडगडात होऊ दे, जोरदार पावसाच्या वर्षावात भरपूर पावसाची गाणी येऊ दे, पावसाबरोबर रेंगाळणा-या आठवणी येऊ दे. तिच्या आठवणी चिंब होउन लगडत आहेत. काळ्याभोर ढगांच्या प्रवासात माझाही निरोप तिच्यापर्यंत जाऊ दे……मस्त पैकी कांदे भजे, वडे, वाफाळलेला चहा, असा बेत होऊ दे, आणि पावसाच्या गदारोळात तिच्या डोळ्यातील पावसाला मात्र थांबू दे. तरीही राहून राहून ना. धो. महानोरांच्या कवितेची आठवण होतेच.

आभाळ भरुन येते पुष्कळ

पहिल्यासारखी बरसात नाही.

नक्षत्रामागून नक्षत्र सरतात

तरीही मृदगंध दरवळत नाही.

गावाकडला गलबला पुसट

ऐकायला येतो डोंगराकडून

अंधार्‍या रात्री प्राण कासावीस होतो.

जुन्या आठवणी स्मरून.

पुर्वीसारखा पाऊस पडत नाही, ही अनेकांची त्रक्रार असते. कधी मुसळधार पावसानं गावच्या गावं पाण्याखाली जातात, तर कधी पावसाचा टीपूस नाही. जीव मेटाकुटीला आणणा-या निसर्गाच्या लहरीपुढे माणूस हतबल झाला आहे. रोहिण्या बरसल्या की मृगाच्या सरी बरसतात. त्यावर एकदा पेरण्या झाल्या की शेतक-याच्या चेह-यावरील आनंद लपत नाही. पण यंदा रोहिण्या बरसल्या नाही. मृगानं दगा दिला. आर्द्रा कोरडाच आहे. जीथं थेंबा-थेंबी झाली तिथं केलेल्या पेरण्या वाया गेल्या.

गुज बोले गुज बोले

गुज मिरोग बोलला

तेलपाणी लावा काव

आता तिफन उचला

इंद्रजीत भालेरावांची पावसापुर्वीची कविता. तिफण उचलली, पेरणी झाली, वाफधावन झाली, पावसाच्या सुकाळात गवत, धान, तरारुन आलेलं आहे. मग पाखरं राखायचेत, चोर राखायचेत, शाळेतला ‘सुगीचे दिवस’ नावाचा धडा आठवायचा. सुगीची कामं दिवस रात्र करुन उरकायची, मळणी, उधळणी, खळं मागायचं, आणि सर्वा उचलत उचलत पुढल्या वर्षीचा हिशोब डोळ्यासमोरुन सरकत जाईल………पुन्हा पावसाच्या वाटेकडे डोळे लावायचे.

सर, इतकं जिवापाड प्रेम करु नका !
एखादा दिवस असा उजाडतो की, त्यादिवशी निर्णय घ्यायचाच असतो. खूप काळ टाळुनही अखेर अटळ असलेला.   आपण वेगळे होणार नसतो पण आपल्यातलं अतंर वाढणार होतं,  हे तुही मान्य करत नाही अन मीही. आभाळ भरुन आल्यावर भावनाशील होतो आपण. गुलमोहराच्या झाडावर फुले असतात तो पर्यंत नजर हटत नाही, अन शब्द संपत नाही  त्याचे कौतुक करतांना. काहीतरी असावं लागते काही तरी जाणवण्यासाठी.  तु अशीच महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीत भेटलेली….आणि मग प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन तुझेच. तुझे निराळेपण अधीकच भावत गेले आणि आपण  अधिक जवळ आलो. त्याचे रुपांतर मैत्रीत कधी झाले कळलेच नाही,  हा माझ्या दोस्तीचा प्रवास.  कधीतरी निर्हेतूक भटकणे, बसमधील नियमित महाविद्यालयापर्यंतचा प्रवास, भान हरपून मारलेल्या गप्पा, हे सारे जरा विचित्रच. मला अजूनही खरे वाटत नाही, तुझे माझ्यापासून दूर जाणे.  सुखः दु:खाविषयी बोललो, कळत नकळ्त, अधिकाधिक गुंता वाढवत परस्पर संबधाचा ! म्हटले तर,  तसे बोलण्यात अनेक विषय अन प्रश्नही न सुटलेले.  कधीतरी गृहीत धरुन घेतो आपण अनेक प्रश्नाची उत्तरे. तुझ्या डोळ्यात पाहतांना तुझी भीती वाटते. खरे तर तसे काही नव्हते ? पण मीही जपले स्वत:ला. माझे सर्वच तुला माहित आहे, मी तुला कधी सांगीतले नाही अन तु ते मला कधी विचारलं नाही.  तु म्हणतेस, सर, तुम्हाला कोणीही फसवू शकते, असे म्हणत असतांना तू मला फसवायचं काहीच कारण नाही. किंबहुना तू मला फसवूच शकत नाही, हे माझे विधान म्हणजे , मी शांतपणे सारे काही स्वीकारतो आणि आहे त्याला सामोरे जातो. यातले सर्वच माझ्यापासून विलग होणार हे जाणतो मी, पण छातीत असह्य कळ आली की मला तुझी आठवण होते. देण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि तुमच्याकडे आहे तरी काय ! असे जेव्हा तु बोलतेस,  तेव्हा मला खिन्न वाटते, स्वत;चे रुप एखाद्या जूनाट इमारतीसारखे….! पण लगेच… मी हे गमतीने म्हणते हं ! असं म्हणायचं . मला हे आवडते, ते आवडत नाही, राग येतो, वाईट वाटते, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही………. हे सर्व मला आवडलेच पाहिजे असे नाही. ….पण तुझ्या गप्पांच्या मैफिलीत रमतो मी. असे अनेकदा घडलंय,  हॉटेलमधील वेटर काही बोलायचा नाही, पण हसायचा ! मग लक्षात यायचं इथून गेले पाहिजे.  निघतांना काहीतरी बोलणं राहून जायचे.  पुढच्या भेटीपर्यंत तीच घुसमट. तुझ्याजवळ काय आहे,  ते मी कधी सांगीतले नाही.   पण तुझ्याकडे आहे, अमर्याद आकाश, सततची समुद्रगाज आणि एक विश्वास झूळझूळ्त्या स्फटीक पाण्याच्या स्पर्शासारखा. तुझ्या माझ्याकडे पाहाणा-यांच्या मनात काय चाललंय, हे ओळखण्याइतपत मनकवडे आपण.   तुझी ओळख करुन देतांना मी कधीच अडखळलो नाही…..सरळ सांगायचो, ही माझी मैत्रीण’, पण तुला ते जमलेच नाही. ‘हे माझे सर’ म्हणत असतांना, मी स्वतःला दूर जंगलात टेकडीवर पोर्णिमेच्या भिजत्या थंडीसह, अपरात्री, त्रयस्थासारखा वाटतो , हे तू कधी पाहिलेच नाही.  जे विसरायला हवं ते विसरता येत नाही.   जे आठवाय्ला हवं ते आठवत नाही.   मला आठवताहेत माझे साजरे केलेले सर्वच वाढदिवस यात वेगळं काही नाही. कारण तू सर्वांचेच वाढदिवस साजरा करतेस. तुझे फ्रेंडसर्कल तसे मोठेच आहे.   अर्थात तेही मला जमले नाही.

खूप दिवसानंतर भेटलेल्या माझ्या मैत्रीणीशी बोलतांना माझे रितेपण तू पाहिल आहे, विसरावे असे काहीच नसते. तुझ्याकडे यायचंय मला. पाऊस पडून गेलेल्या सायंकाळी, मंद उदास प्रकाशात… मी वाचणार आहे माझी कविता तुझ्या परवानगीशिवाय. असा विचार येतेवेळी फुलदाणीत आलेला निर्जीवपणा विसरता येत नाही. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? माझ्या ओठापर्यंत आलेला शब्द मला परत गिळता येत नाही. मी तुझ्यासमोर संपूर्ण काळोखी गुहेसारखा. तू फूलपाखराइतकी सहज वावरतेस त्यातल्या एक एक दालनात. तुला ठाऊक आहे, माझ्या आत्मविमन्सकतेचा ढासळत जाणारा प्रत्येक कोपरा आणि कदाचित एखाद्या जागी असलेली खोल अंधारात प्रेमाची ओल. तुझ्यापासून मी काय लपवून ठेवू ? उभा आहे मी तुझ्याच सुफल सहवासाच्या मातीवर ! ‘सर, यानंतर इतके जिवापाड प्रेम कोणावर करु नका ! तुम्हाला ते जमत नाही, हे सांगायला तू विसरत नाही. लेणीतील शिल्प असो, की निसर्गचित्राचे दालन. ते पाहतांना त्यावरची तासनतास चर्चा.  माझ्या लक्षात आलंय, मी तुझ्या चित्रात आहे, रंगात आहे, कुंचल्यात आहे, मी तुझ्यात आहे, तुझ्या डोळ्यातल्या इवल्याशा एकाकी प्रतिमेसारखा. गाण्याच्या मैफलीत तू गाणं गातेस तेव्हा मी डोळे मिटून तुझ्या दूर जाण्याचा विचार करतो. का ? तू पुन्हा येशील तेव्हा तू लावलेलं गुलमोहराचे झाड वाढलेले असेल न ओळखण्याइतके. म्हणूनच माझ्या मैत्रीचा पराभव झाला असं वाटतं ! अंधूक प्रकाशात दाटून आलेला हूंदका मला नेईल कदाचित जुन्या काळात. सारे काही स्तब्ध झाल्यावर तुझ्या गाण्यांचा आवाज आणि अर्थही कधी समजेल मला. पण मीच पुन्हा आल्याचं कळवणार नाही कुणाला. खूप थंडी असेल तर बरोबर घेऊन येईन आठवणीने माझा नेहमीचा ओव्हरकोट. दु:ख गुरफटून घेता येईल इतका ढगळ शिवलेला. तोच एक धागा सुखाचा अन शंभर धागे दु:खाचे…..!