Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 22 मे, 2007

या दशकातील साहित्य.

मराठी साहित्य क्षेत्राकडे नजर टाकली तर या दशकातील महत्वाची म्हणावी अशी किंवा यूगांतराची भान प्रकट होइल अशी कोणतीही घटना दिसत नाही.कवितेपासून तर समीक्षेपर्यंत लेखन विचारात घेतले तरी झटकन लक्ष वेधले जावे, असे लेखन दिसत नाही .या दशकातील नव्या जाणिवा वैचारिक प्रगल्भता असणारे मराठी साहित्य अपवादानेच दिसते आहे.खरे तर ही मरगळीची सुरुवात नव्वदीपासुनच झाली.असे मानायला हरकत नाही.पुस्तक प्रदर्शनात गेलो तर भरपुर पुस्तके दिसतात.लिहिणा-यांची संख्या वाढलेली आहे,पण तेही मागील साहित्यावरुनच किंवा त्या आधारावर लेखन केलेले दिसते.हीच अस्वस्थ करणारी बाब आहे. नव्वद ते आज पर्यंत चा काळ मला तरी मरगळीचा काळ,अस्वस्थ करणारा काळ आहे.असे वाटते.या पूर्वीच्या काळाचा विचार केला तर वाडःमयीन चळवळी आणि त्याच्यातून एक समरुद्ध् वाडःमय प्रवाह निश्चित होत असे,वाडःमयीन व्यक्तिमत्व, वाडःमयीन चिकीत्सा,त्यांनी घडविलेला लेखक,वाडःमयीन वाद अशा घटनांनी तो काळ बहरलेला होता.प्रत्येक दशकात एक मुल्य विचार निर्माण झाल्याचे दिसते.मागील दशकात आणि या दशकात मात्र सर्वच साहित्यप्रकारात सामसूम दिसून येते. अपवाद आहेत .मनोगत,माझे शब्द, मायबोली,आणि आता उपक्रम या वरील लेखांचे कोणी संपादन केल्याचे मला तरी आठ्वत नाही.कारण वरील संकेतस्थळावर दर्जेदार लेखक आहेत.पण साहित्यिक म्हणून त्यांची नोंद कोणत्या प्रसिद्ध् किंवा रविवारच्या पुरवणीत लेखन करणा-या कोणी लेखक, समीक्षक,किंवा संपादकाने केल्याचे मला स्मरत नाही.सांगायला काही हरकत नाही.मराठी प्राध्यापकांच्या एका उद्बबोधन वर्गात आम्ही मराठी संकेतस्थळाविषयी आणि मनोगतावरील लेखकांविषयी त्यांच्या लेखनाबद्द्ल बोललो तेव्हा परीक्षक म्हणुन आलेल्या दोन मराठवाड्यातील,आणि साहित्य सहवास मुंबइहुन आलेल्या एका मराठीच्या अभ्यासकाच्या भुवया उंचावलेल्या आम्ही पाहील्या आहेत.सांगण्याचा मुद्दा असा की,या दशकाचे साहित्यभान म्हणुन् मी या संकेतस्थळांवरील् भाषाविषयक लेखांकडे पहातो.तरीही या दशकातील मराठी साहित्याचा विचार करु लागलो की लक्षात येते की,साठ पासून् ते दोन हजार पर्यंत चे बलवान झालेले साहित्य प्रवाह आजही आहेत. पण त्या प्रवाहाचा वेग कमी झालेला दिसतो.सपाट जमिनीवर विखूरलेले पाणी त्या प्रमाणे,साहित्य प्रकाराचे झाले आहे.लेखकांची संख्या वाढली पण असे पुस्तकच नाही की ते कधी वाचु अन् कधी संपवु असे वाटावे,आणि वाचल्यानंतर जे प्रदीर्घ काळ मनात रूजत राहील असं पुस्तक कोणतं ? या प्रश्नाचेन उत्तर देता येइल अशी स्थिती नाही .या दशकात सहा वर्षाच्या काळातील उत्तम लेखक कोणता हे सांगता येणार नाही.या काळातील आवर्जून् नोंद घेणारी साहित्यक्रुती कोणती हे सांगता येणार नाही.(बारोमास सोडून् द्या)मागील काही दशकातील् लेखक आहेत,पण आता त्यांचे लेखन ही उतार वयाला लागलेले दिसून् येते.त्यांची जागा घेणारे नवे लेखक अवतीभोवती दिसत नाही.ज्यांनी काही अपेक्षा निर्माण केल्या ते लेखक कवी,एका पुस्तकातच संपून् गेल्याचे दिसते.हे दशक संगणकाचे ,विज्ञानाचे ,असले तरी त्या संबधी चे लेखन दिसत नाही.या काळातील महत्वाचे प्रश्न किंवा विचार कोणता यांची चर्चा दिसत नाही.साहित्य संमेलनाच्या आगे मागे झालेले वाद जे वर्तमानपत्रात येऊन त्याची चर्चा झाली म्हणजे ते वाडःमयीन वाद.पुरवण्यांमधुन केले जाणारे पुस्तक परिक्षण म्हणजे समिक्षा झाली आहे.संपादकीय किंवा विशेष् लेख हे वैचारिक लेख झाले आहेत.आता प्रश्न् आहे की हे असे का ? याचा विचार केला तर लक्षात येते की ,प्रसिद्बीसाठी माध्यम उपलब्द्ग झाल्यामूळे चिंतन मंथनाचा अभाव ,विश्लेषण करण्याचा अभाव. आता त्याची गरज साहित्यिकांना वाटत नाही. मजकूर मिळावा म्हणून् धावणारे दैनिकेही त्याचा आग्रह धरत नाही.अंतर्मुखतेचा अभाव,वैचारिकतेचा अभाव,वैचारिक संकोचता,साहित्य विचारासाठी लागणारी तयारी ,तात्विक बैठक या अभावामुळे मराठी साहित्यस्रुष्टीला अवकळा प्राप्त झालेली दिसून येते.ती दुर करण्यासाठी ,ते सर्व अभाव दुर केले पाहीजेत. पण सांगणार कोण ,आणि सांगीतले तरी माझ्या सारख्या विद्यार्थापुरते मराठी शिकवणा-या प्राध्यापकाचे ऐकणार कोण ?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: