Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 22 मे, 2007

विश्वमान्य धर्म ?

       विश्वमान्य धर्म…जगातील विचारवंत,तत्वचिंतक,विश्वमान्य धर्माचा विचार करत आहेत.एच.जी.वेल्स चे नाव या विषयासंबधी मोठ्या आदराने घेतले जाते.त्यांच्या आश्चर्य कारक,व रोमांचक लघूकथा अनेकांनी वाचलेल्या असतील.तरिही विश्वमान्य धर्माच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी त्यांची अर्थ-गंभीर पुस्तकेही त्यांनी लिहीली आहेत.Outlines of the History of the world या पूस्तकात त्यांनी विश्वराजसभा शक्य आहे याचे जोरात समर्थन केले आहे.अशी राजसभा शक्तीवर नव्हे तर भक्तीवर आधारित असली पाहिजे.मानवप्रेम-व्यक्तिप्रेम यांच्यावर ती उभारली गेली तर नक्की टिकेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.अर्थात धर्माचे बंधन असेल तरच वैश्विक राजसभा टिकून राहील.पण तो धर्म आज तुम्ही आम्ही ज्याची कल्पना करतो,तसा संकूचित राहणार नाही.प्रतिक्रियात्मक( reactionary)ही असणार नाही,
नसणार.तर सात्विक पार्श्वभूमीवर आधारित बनलेला असेल.हा लेखक लिहितो त्याप्रमाणे ” It will be based upon a common world religion very much simplified and universalised and better understood” अस धर्म कोणत्या प्रकारचा असला पाहिजे त्याची चिकित्सा करतांना तो सांगतो:” It will not be Christianity,nor Islam nor Buddhism,nor any such specialised form of religion That religion will be based on selfless human service”अर्थात अशी विश्वसभा एक फारच साधी,सरळ व सहजपणे समजू शकेल अशा सामान्य विश्वधर्मावर आधारलेली असेल.तसेच कोणत्याही प्रकारच्या धर्मावर आधारलेली नसेल.म्हणजेच निष्काम कर्मयोगावर आधारलेला असेल. या कथनाद्वारे भावी विश्वधर्मावर आज असलेल्या सर्व संप्रदायावर तलवार चालवून आजच्या विचारवंतांनी मानवाची गरज (necessity)काय आहे व त्याचा विचारप्रवाह कोणत्या दिशेला धावत आहे याचे स्पष्ट दर्शन घडविलेले आहे.ते दाखवून देत आहे की, हे सर्व संकूचित विचार व जेथे सांप्रदायिक मतभेदांचे नाव राहाणार नाही असा निस्वार्थी मानवसेवे (selfless human service)चा म्हणजे निष्काम कर्मयोगाचा धर्मच मान्य होईल.पण कोणता धर्म आहे ,जो जगाचा सामान्य धर्म बनू शकेल? जगाची आवश्यकता कोणता धर्म पूर्ण करु शकेल.?   
            वेल्स यांच्याच first and last things नावाचे पूस्तक धर्माच्या दोन संभाव्यतेवर प्रकाश पाडते.”विश्वशांतीसाठी अशा धर्माची आवश्यकता आहे की,जी व्यक्ती व समाज म्हणजेच जगावर आंतरिक व बाह्य विचारांवर अंकूश ठेवू शकेल.”व्यक्ती व समाज या दोघांचा ज्याने विचार केला असेल तर तोच धर्म जीवनाला उपयोगी पडु शकेल.केवळ परलोकाचा विचार करणारे काही धर्म आहेत,केवळ इहलोकाचा विचार करणारे काही धर्म आहे,काही इह-परलोकाचा विचार करणारे आहेत पण आपणाला आज इहपरलोकाचा विचार करून सामाजिक स्थिरता आणणारा व व्यक्तीचा वयक्तिक विकास करणारा धर्म हवा आहे.
ब.रसेल यांनीही Social Reconstruction नामक पुस्तकात जगातील धर्माचे विवेचन करून त्याचे वर्गीकरण केलेले आहे.तो त्या विवेचनातून सांगतो: Religion is partly personal and partly social, to the Protestant it is primarily plersonal, to the Catholicit is primarily social.त्याला प्रोटेस्टंट धर्म देखील primarily personal वाटतो.या सर्व विवेचनानंतर तो अशा निर्णयावर येतो की,”It is only when the two elements are intimmately biended :that religion becomes a powerful force in moulding society.”म्हणजे हा एक नवा धर्म असला पाहिजे .जो जगाच्या उलट्या-सूलट्या प्रवाहात उभा राहू शकेल व जगाला-व्यक्तीला समाजाला खरा रस्ता दाखवू शकेल.
सारांश,जगाला कोणत्याही प्रकारची संप्रदायिकता,संकूचितता वा पक्षबाजी यांच्यापासून दूर अशा धर्माची गरज आहे.कोणती एक वस्तू वा व्यक्ती यांचा आग्रहरहित धर्मच व्यक्तीचे व समाजाचे जीवन उन्नत करू शकतो.इहलोकात व परलोकात मानवाला सुख,शांती व समाधान देऊ शकतो आणि असाच धर्म विश्वधर्म शकतो .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: