Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 23 जून, 2007

साहित्यातील “अभिजातवाद”

       साहित्याच्या वादातील एकवाद म्हणजे “अभिजातवाद”.
गेल्या अनेक वर्षात अनेकवाद साहित्य चर्चेत दिसून येतात.त्यापैकी हा एक आहे.अभिजातवाद म्हणजे जातिवंत किंवा अव्वल दर्जाचे.’अभिजातवाद’ज्याला इंग्रजीत ‘ क्लासिझम’ असे म्हणतात.ज्या साहित्यकृतीचा रसिकाच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव राहतो.अशा दीर्घकाळ टिकणा-या साहित्यकृतीला अभिजात म्हणतात.

        युरोपातील ग्रीक व लॆटीन भाषेमध्ये अशा अभिजात साहित्यकृती निर्माण झाल्या,व त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो.अशा प्रवृत्तीच्या म्हणजे,खूप कालावधी लाभलेला तो अभिजातवादी संप्रदाय.ग्रीक,लॆटीन,संस्कृत,भाषांचा अभिजात भाषा म्हणून उल्लेख करतात.”जीवनासाठी कला “असे या संप्रदायाचे वैशिष्ट्ये आहे
      कलावंताने मानवी जीवनाचे निरीक्षण करावे,आपल्या लेखनातून ते मांडावे,ज्यातून  समाजाला काहीतरी उदबोध झाला पाहिजे.आणि ज्यातून जीवनाचा अर्थ कळण्यास मदत होईल.असा एक विचार या संप्रदायाचा सांगता येईल. समाजातील रुढी,परंपरा,आदर्श,यांचे पालन समाजात होते,असे जे कोणते साहित्य असेल,किंवा ज्याच्यामध्ये जीवनभाष्य उत्तम रीतीने आलेले असेल.ते अभिजातवादी साहित्य.
         लेखकाच्या अनुभवापेक्षा,सूक्ष्म निरीक्षणे वस्तुनिष्ठपणे करून समाजाला आनंदाबरोबरच उपदेश करताना “काय आहे, यापेक्षा “काय होणे शक्य आहे” हे सांगण्याची धडपड या साहित्यामध्ये आहे.अभिजातवादी साहित्य पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेवर प्रेम करणारे आहे.परंपरेचा अनुकरण या संप्रदायाचा महत्त्वाचा गूण,नियमांच्या चाकोरीत राहून लिहिणे हा त्याचा एक भाग,त्याच बरोबर “जुनं ते सोनं” हा विचार स्वीकारलेला असल्यामुळे ते साहित्य विश्वासार्ह वाटते.
       साहित्यिक आपला अनुभव व्यक्त करताना कल्पनाविलासात रमत नाही.तर जे वास्तविक आहे,ते सांगण्यावर भर देतो.आत्माविष्कार ज्या साहित्यप्रकारातून करायचा आहे,त्या साहित्यप्रकाराच्या चौकटीतून लिहिण्यावर अधिक भर या साहित्यप्रकाराचा असतो.या प्रकारांच्या नियमनामुळे अभिजातवादी साहित्यकृती अधिक प्रमाणबद्ध,रेखीव,व निर्दोषपणाकडे जाणारी असते.
        अभिजातवादी साहित्याचे थोडक्यात परंपरानुकरण,आदर्शावर श्रद्धा,शुद्धता,असे गुणविशेष सांगता येतात. या वादातले हे अंतिम मत आहे,असे मानन्याचे कारण नाही. हा धावता आढावा आहे.साहित्यातला स्वच्छंदतावाद,आणि वास्तववाद या वादाचे निर्मितीचे कारण अभिजातवाद आहे, हेही आम्ही जाणतो.त्याबद्दल काही शंका असण्याचे कारणच नाही.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: