Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 24 जून, 2007

उपक्रमचा एक तास.


विद्यार्थी मित्र हो,
आज आपण साहित्याच्या वादांचा अभ्यास करणार आहोत,साहित्याकडे,आणि साहित्यवादाकडे, पिवळा चष्मा लावला की जसे…
“माफ करा,अशा कंटाळवाण्या विषयाकडे आम्हाला खेचू नका,आम्हाला काही देण घेणं नाही,कोणत्याच साहित्यवादाशी.पीवळा चष्मा घातला की, जग पिवळे दिसते,हे तर लहान मुलगाही सांगेल,दुसरे काही उदा..नाही,का तुमच्याकडे,..!. प्रियाली म्हणाल्या. (पून्हा त्या विकीवर माहितीची जोडाजोड करु लागल्या )
खरे तर प्राचार्यपदाची धुरा यांच्या खांद्यावर पण वर्गात विद्यार्थी म्हणून बसतात. मास्तरानं आवंढा गिळला, यनावाल्यांनी मास्तराकडे पाहून स्मित हास्य केले,त्यांचे वहीच्या शेवटच्या पानावर गंधर्व,आणि यक्षांच्या कुंडल्या मांडण्याचे काम सुरु होते.
बरं ! बर ! “आपण ताजमहालाबद्दल बोलू,त्याच्याकडे पाहिल्यावर मनात कोणत्या सौंदर्याचा विचार येतो, ते सांगा ? आपल्या लाडक्या विद्यार्थ्याकडे वळत मास्तर म्हणाले,
“युयुत्सु तुम्ही सांगा बरे काही…!
युयुत्सू उभे राहिले,डाव्या हातात लॆपटॊप,त्याच्यात बरीच माहिती फिल्ड केलेली असते.मास्तराला वाटले,हा उत्तर देतो की,ताजमहालाचे इष्टीमेट, कूणास ठाऊक. पण आज युयुत्सूच्या मुड काही वेगळा होता,म्हणाले…
“ताज महाल म्हणजे,मुमताजचे आरसपाणी,सौंदर्य….!मुमताजची स्कीन..आणि रक्ताच्या प्रमाणामुळे….
आणि असे म्हणून संगणकाकडे नजर टाकली मास्तराला माहित होते, हा नक्की गुगलशोधाशोध करेल आणि नंतर दूव्यावर नेणार,
“बरं राहू दे”, “तात्या तुम्ही सांगा बरं…!
पुरिया-कल्याणाची तयारी करावी तशी,त्यांनी उजवा हात वरती नेला,आता काही खरं नाही,मास्तर जरा चपापला. वाटले दोन चार शिव्या मी नाही, तर औरंगजेब नक्की खाणार…पण तात्याचा आज रोमेंटीक मुड, म्हणाले….
“बिरुटेसाहेब, (असे म्हटल्याबरोबर युयुत्सुने दोनदा पाय आपटले )ताजमहाल म्हणजे,हजारो कारागिरांच्या छाटलेल्या हातांच्या वेदनेचे प्रतिक,म्हणून तर यमुनेला अजूनही रक्ताचा वास आहे.(रक्ताला वास)ताज म्हणजे भूप…..ताज म्हणजे बसंत…..”‘
बरं ! बरं..! मास्तराने थांबवले, “गुंड्याभाऊ …तु सांग…..!
हे महाराज उभे राहिले,बराच वेळ हसतच होते, आणि म्हणाले
“हिंदीतून बोलले तर चालेल का” ?
“त्याची काय परवानगी मागायची..!. हे काय संकेतस्थळ आहे परवानगी मागायला,”मास्तर खवळला.
(रावसाहेब,दरवाजाआडून हे सर्व संवाद ऐकत होते,हातात पाण्याचा ग्लास.कुठे एकदा हा मास्तर जसा,लिहितांना शब्दांच्या चूका करतो,तसा बोलतांना करतो का ?तसे झाले तर कधी एकदाचा मेमो देतो असे त्यांना झाले होते,मागच्या बॆंचवर उपक्रमचे संपादक मंडळ बसले होते,व्याख्यान माहितीपूर्ण होते की नाही, हे पहाण्यासाठी.
गुंड्याभाऊने सुरुवात केली…
“मुमताज की कब्र पर हर आशिक को,मोहब्बत की मिसाल नजर आती है !
हम किस किस के लिए ताजमहेल बनवायेंगे,हमे तो हर शादीशुदी औरतमे मुमताज नजर आती है !
आणखी काही ऐकवेल,या भीतीने मास्तरानं त्याला बळजबरीने दोन्ही खांद्यावर हात टेकवून खाली बसवला.
“हा गुंड्या म्हणजे,ना” !
राधिका,अनु,चित्रा, यांचे स्वगत काही मास्तराला ऐकाला गेले नाही.पण एकमेकींच्या हातावर दिलेल्या टाळ्या मास्तराच्या चानाक्ष नजरेतून सुटल्या नाहीत. तितक्यात तास संपल्याचे टोल पडले.
सर्व विद्यार्थी,उपक्रम च्या ध्येयधोरणाच्या तासाला निघून गेले. तरिही, मास्तराचे साहित्यातील “अभिजातवादा”वरचे व्याख्यान चालूच होते.तात्या,अन गुंड्या,कंटाळले तरी मास्तर आपला आहे,म्हणून बसलेलेच होते.

Advertisements

Responses

 1. vaa Birute saheb, masta lihila aahe! 😉

  aaplaa,
  Tatyaa.

 2. he vachun asa vatat ki janu tumhala Pu.la.Deshpande yancha ashirvaad aahe!

 3. Nop, humar is not your cup of tea. It seems that you tried to copy similar articles from manogat and ex-manogat groups.

 4. प्रिय ‘s’

  आकृतीबंध सारखा असला म्हणजे ’कॊपी’ होत नसते.सध्या उपक्रम या संकेतस्थळावर वावरणा-या सदस्यांच्या व्यक्तिरेखांवर ’साहित्यातील अभिजातवाद’ या लेखाच्या निमित्ताने हे आमचे स्वतंत्र लेखन आहे.

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: