Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 30 जून, 2007

स्वप्न आणि सत्य !

       आपणास स्वप्न पडतात.कधी ती आनंद देतात,कधी दु:ख,एखाद्या प्रश्नाबाबत ती कधी बुचकळ्यात टाकतात, तर कधी त्याचा उलगडा करतात.पण खरा प्रश्न आहे तो हा की,स्वप्नाचा सत्याशी काही संबंध आहे काय ?त्यातून काही उद्दिष्टपूर्ती होते काय ? एक प्रसिद्ध उदाहरण स्वप्नाच्या वास्तवेतेशी दिल्या जाते. “ग्युसेप तारतिनी (टॉरटीने) हा अठराव्या शतकातील सुप्रसिद्ब् व्हायोलिन वादक.त्याचे संगीत-स्वरसंयोजन(sonata)चालू होते.त्यातील अवघड भागाची रचना करताना आता काय करावे असा त्याला प्रश्न पडला,विचार करता करता तो थकला व त्याचा डोळा लागला.झोपेत त्याला स्वप्न पडलं.स्वप्नात सैतान दिसला.त्यानं त्याला त्याच्या आत्म्याच्या मोबदल्यात स्वरसंयोजन पुरं करण्याचं आश्वासन दिलं.तारतीनीने ते मान्य केलं. जाग आल्यावर तारतिनिनं स्वप्नात ऐकलेले ते स्वर -संयोजन स्मृती आधारे कागदावर उतरवलं हेच ते तारतिनीकृत प्रसिद्ध “द डेव्हिल्ज ट्रिल सनाट”( The Devils Trill Sonata)होय. वरील उदाहरणाप्रमाणे अन्य कलावंतांना,वैज्ञानिकांना आणि साहित्यिकांना पडलेली स्वप्ने,त्यातून स्फुरलेल्या कल्पनांच्या आधारे लागलेले शोध व अवतरलेल्या कृती याविषयी आपण खूप ऐकत असतो. आर.एल.स्टिव्हेन्सनच्या “डॉ.जेकिल ऍन्ड मि.हाईड”मधील ब-याच घटनांना लेखकाला पडलेल्या स्वप्नाचा आधार आहे.कोलरिजची ‘कुब्लखान’ही कविता आणि डि.क्किन्सीचं ‘द कन्फेशन्ज अब् अन् ओपिअम-इटर हे आत्मचरित्र ह्यांचा स्रोतही अफू खाल्ल्यानंतर आलेल्या गुंगीत पडलेल्या त्यांच्या स्वप्नात आहे.” नेहमीप्रमाणे आपल्यासारखाच माझाही या गोष्टीवर विश्वास नाही.पण मी रिस्क घेत नाही.आपले मत काय आहे.

Advertisements

Responses

  1. l like u r blog.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: