Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 21 एप्रिल, 2008

गझल

कुठेतरी कुणाचे अस्पष्ट नाव आहे,
आता मी सोसला, तो खोल घाव आहे

तेव्हा मुकीच होते, आता मुकीच आहे
आता मुकेपणाचा झाला, सराव आहे

जातीच्या प्रेमानं मी चिंब चिंब झाले
आता धगीत माझे उद्ध्वस्त गाव आहे

बोललेच नाही, माझ्या व्यथा कुणाला
सोसून सर्व घेणे, माझा स्वभाव आहे

आम्ही येथे भुकेले, तेही तिथे उपाशी
प्रत्येक माणसाला आमचीच हाव आहे.

गावात आम्ही हरलोच बाजी
सजा न द्यावी त्यांना ऐसा ठराव आहे. 

पाचोळाच जीवनाचा झाला अखेर माझ्या
सांगा मित्रहो, माझा दोष काय आहे.

Advertisements

Responses

 1. आपल्या कविता छान आहेत. मला आवडल्या. मी नेहमी आपल्या कविता वाचतो.

 2. khup sundar gazal aahe

 3. आपली कविता सुंदरच आहे
  सामंत

 4. आपला भाषेसंबधी लेख सापडात नाहीय. मला या विषयात खुप उत्सुकता आहे

 5. आमच्याकडून लेख प्रकाशित करण्याबाबत काही तांत्रिक चूक झाली. त्यामुळे लेख दिसत नसावा.
  ( आपल्या प्रतिसादामुळेच आम्ही पुन्हा त्यात लक्ष घातले. नाहीतर आम्ही लेखन प्रकाशित झाले. असे समजून मोकळे झाले होतो. 🙂 )

  आपली प्रतिक्रिया आमचा लेखनाचा उत्साह वाढवते. आपले मनापासून आभार !!!

 6. gazal aavaDalee !

 7. gazal aawadali.

 8. ajun dusarya gazal vachayachya aahet.

 9. कौतुकाच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे सर….!

 10. kvita pathavayachya aahet.

  • अहो, तुमच्या कविता तुमच्या ब्लॊगवर टाका.

   किंवा सार्वजनिक ठिकाणी..जसे, http://www.misalpav.com इथे तुम्ही तुमचे खाते उघडा.
   आणि तिथे तुमच्या कविता टाकता येतील. काय म्हणता ?

 11. Gazal kukpach sundar aahe.

  (तेव्हा मुकीच होते, आता मुकीच आहे
  आता मुकेपणाचा झाला, सराव आहे) atishya aawadali.

 12. mala tumachi gazal khupch avadli.jo bhav sangaycha ahe to khupch marmik shabdat sangitlay.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: