Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 6 जून, 2008

बीबी का मकबरा

नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.!!!

बीवी का मकबरा

या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे असे म्हणतात. परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे.  आगर्‍याचा ताजमहाल संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. तर मकबरा हा पांढर्‍या मातीपासुन (प्लास्टर)  बनविलेला आहे. एका भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर प्रवेशदारात मोठा पाण्याचा हौद आहे. त्यात डोलणारी कमळांची फुले लक्ष वेधुन घेतात. त्यानंतर पुढे कारंजे आणि दोन्ही बाजूने दगडी रस्ता आहे. दोन्ही बाजुने सरुची वृक्ष लावलेली आहेत. बीबीच्या मकबर्‍याची भव्यता आणि सौंदर्य डोळ्यात साठवण्याच मोह व्हावा. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला आहे. मकबर्‍यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. पुर्वी थेट तिथे जाता येत होते आता तो भाग प्रवेशासाठी बंद केला आहे. कबरीच्या चारही बाजुने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. कबरीची रचना करतांना वरील छतांच्या खिडक्यांची  अशी रचना केलेली आहे की त्या कबरीवर दिवसा सुर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश त्या कबरीवर पडतो. मकबर्‍याचा घुमट संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजुने दोन ताळी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी मिनारावर जाता येत होते. पण लोकांनी इहलोकाची यात्रा संपवण्यासाठी या जागेची निवड केल्यामुळे हा रस्ता कायमचा बंद करण्यात आलेला आहे.

29042008042

औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणार्‍या काही वस्तु भांडे, फर्निचर,वस्त्र, लाकडी फर्निचर,  या संग्रहात ठेवले आहे. पण हे संग्राहलय सुद्धा बंद करण्यात आलेले आहे.

29042008032 29042008035 29042008037

आजुबाजुच्या वीट भट्ट्यांमुळे संगमरवरी वास्तु काळी पडत  आहे. त्याला रंगकाम देण्याचे काम सतत चालले असते.

मकाइ दरवाजा

औरंगाबाद शहरात किमान सोळा किंवा अधिक दरवाजे अजुनही येणार्‍या जाणार्‍याचे स्वागत करुन  गतकाळाची आठवण देत असतात.

29042008018

पुरातत्व खात्याने जर इमारतींची काळजी घेतली नाही तर आजुबाजुच्या वीटभट्ट्यामुळे ही सुंदर शिल्प काळाचे पडद्याआड जातील असे मात्र राहुन राहुन वाटते.

 

 

 

 

 

Advertisements

Responses

 1. Taj Mahal chi information good.

 2. प्रतिक्रियेबद्द्ल आपले मनापासून आभार….!!!
  पण ही ताजची प्रतिकृती बीबीका मकबरा आहे, ताजमहाल नव्हे !!!!

 3. दिलीपजी,
  माहिती मनोरंजक आहे.फोटो सुंदर आहेत.फोटो चटकन पाहिल्यावर ताजमहालचाच वाटतो.पण निरखून पाहिल्यावर मधला डोम निराळा दिसतो खरा.
  ताजमहालचा मधला डोम जरा ह्या मकबऱ्यापेक्षा जास्त रुंद दिसतो.कदाचित माझं ऑबझरवेशन चुकीचं असेल.
  एक शंका आहे.
  औरंगझेब बराच कंजुष होता असं ऐकलं.जमिनीवर झोपायचा, बसायचा आणि स्वतःची पादत्राणे स्वःच दुरुस्थ करायचा.कपडे वापरण्यात पण कंजूष होता असं कुठेतरी माझ्य वाचनात आल्याचं वाटतं.
  अशा परिस्थितीत कसलं फर्निचर वापरायचा ह्याचं जरा कुतुहल वाटलं.एव्हडंच
  सामंत.

  • auranzeb ha kanjus navta to ek badsha asune swabhimani hota swatachi kame swatach karaycha manun tumala as vatat asel ki to kanjus hota pan to dharm veda hota

 4. इयत्ता सातवीत असताना आई-बाबांबरोबर मी बीबी-का-मकबराला भेट दीली होती.त्या आठवणी ताज्या झाल्या. सर्व छायाचित्रे सुंदर आहेत.

 5. सामंत साहेब,
  औरंगजेब कंजुष होता हे खरे आहे, फर्निचर म्हणजे वापरातल्या वस्तु असे म्हणायचे आहे.

  प्रतिक्रियेबद्दल आपले आभार !!!

  परुळेकर साहेब, आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आनंद वाटला !! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

  -दिलीप बिरुटे

 6. tajmahal temple.

 7. it will in more detail & history should be detailed with maximum images .rest of all is very exellent.

 8. माहिती आणि फोटो अत्यंत सुरेख आहे. अशा ऐतिहासिक वास्तुचे जतन आणि संवर्धन होत नाही केवळ सरकारी पध्दतीनेच ते होते याच वाईट वाटतंय. आपल्या सारख्याच्याच लिखाणामुळे जागृती होईल असं वाटतय.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: