नंद्या (नागेश भोसले ) गरीब शेतकरी. घरात बायको माली (माधवी जुवेकर), आई, बहीण आणि मुलगा असे कसे तरी हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढणारे हे शेतकरी कुटुंब. शाळेत फिस भरायला पैसे
![]() |
नाहीत म्हणून शाळा सोडून देणारा त्याचा मुलगा. मागील वर्षी घेतलेल्या कापसाच्या पैसे मिळाले की चालू वर्षी बी -बियाणे घेता येईल असा सतत विचार करणारा एक काबाड-कष्ट करणारा एक सामान्य शेतकरी. शिक्षन घेऊन संस्थेत डोनेशन भरुन नौकरी मिळविता येईना म्हणून शहरातून शेतीसाठी गावाकडे परतलेला नंद्याचा मित्र राजाराम (मकरंद अनासपुरे). शेतीसाठी बी-बियांणांची व्यवस्था करण्यासाठी आणि बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी सतत कार्यालयात हेलपाटे मारुन थकलेला कर्जबाजारी शेतकरी. पैसे मिळावेत यासाठी पशुधन आणि दागिणे सावकाराकडे ठेवावे लागते. असे सतत संकटाशी लढणारे नंद्याचे शेतकरी कुटुंब.
कर्जबाजारी होऊन गावातील संभा आणि आणखी एक शेतकरी आत्महत्या करतात. कर्जमाफीचे पॅकेज, प्रसारमाध्यमे, गावात तोकडे प्रयत्न करणारे स्वयंसेवी संस्था, अशा विविध अंगाने चित्रपट पुढे सरकत जातो. दुबारपेरणीमुळे कर्जबाजारी झालेला नंद्या शेतकरी त्याच्या बहीणीला टोपल्या वगैरे बनविण्याच्या कामाला पाठवतो. तिथे तेथील मालक तिच्या आब्रुवर टपून बसलेला असतो. नंद्या कर्जबाजारात वाहात जातो. आणि किटकनाशक पिऊन आत्महत्या करतो.
इथे चित्रपटाचे मध्यंतर होते मी सॆंडवीच शोधतो ते काही मिळत नाही. मग कॊफी घेतो. पुन्हा माझ्यासिटवर येतो तर दुसरा प्रेक्षक माझ्या खुर्चीवर बसलेला असतो. त्याला वाटले मी गेलोय, तशी प्रेक्षकांची संख्या कमीच होते.
मध्यंतरानंतर चित्रपट पुढे सुरु होतो. राजा आपल्या मित्राच्या आत्महत्येने व्यथीत होतो. शासनस्तरावरील भ्रष्टाचाराचा बदला घ्यायचे तो ठरवतो. आता तो बदला कसा घेतो ? शेतक-यांचे प्रश्न सुटतात का ? सरकारातील कृषीमंत्री (सयाजी शिंदे) शेतक-याला न्याय देतो काय ? या आणि अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी गोष्ट छोटी डोंगराएवढी पाह्यलाच हवी.
एक गोष्ट मात्र खरी आहे की, निळू फुल्यांना चित्रपटात फार संधी मिळालेले नाही. संपूर्ण चित्रपटात त्यांच्या वाटेला फार कमी संवाद आले आहेत त्यांचा हा शेवटचा चित्रपट. अतिशय
![]() |
थकलेले निळूभाऊ पाहतांना -हदयात कालवा कालव होते. फार कमी बोलूनही दारिद्र्यात पिचलेला शेतकरी लक्षात राहतोच. मकरंद अनासपुरे यांनी सुशिक्षित शेतक-याची भूमिका चांगली केली आहे. पण, इतर चित्रपटातून लक्षात राहणारा मकरंद अशा चित्रपटात शोभत नाही असे वाटले. आत्महत्या करणारा शेतक-याच्या भुमिकेत असणारा नागेश भोसलेची धष्टपुष्ट तब्येत पाहता तो शेतकरी वाटत नाही. मात्र दिनवाणा, दुबळा, रडका चेहरा, तिरपी मान, याबाबतीत अभिनय चांगला केला आहे. सयाजी शिंदे यांनी कृषीमंत्र्याची भुमिका चांगली रंगवली आहे. चित्रपटातील काही प्रसंग चांगले झालेले आहेत जसे, शेतक-याच्या आत्महत्येनंतर विविध वाहिन्याचे वृत टीपण्यासाठीची धडपड, शेतात मानेवर पेरणीसाठी तिफणीला बैलाबरोबर जुंपून घेणारा शेतकरी, शेतक-याकडे पैसे नसतांना विविध हौसे-मौजेच्या योजना घेऊन येणारे फायनान्सर, शासकीय कार्यालयात शेतक-यांची शोषण करणारी शासकीय वृत्ती हे आणि काही प्रसंग चित्रपटाला एक उंची देतात. चित्रपट पाहून सुन्न वगैरे होते का ? या प्रश्नाच्या उत्तराऐवजी शेतक-यांच्या प्रश्नाची जाण चित्रपटात अधिक वास्तवतेने येत आहे, ते नेटकेपणाने निर्माते मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, आणि दिग्दर्शक नागेश भोसले यांनी मांडले आहे. इतकाच एक चांगला विचार चित्रपटगृहातून बाहेर पडतांना मनात निर्माण होतो.
चित्रपट : गोष्ट छोटी डोंगराएवढी
दिग्दर्शक : नागेश भोसले
निर्माते : सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे,
माझा हा चित्रपट बघायचा राहिला आहे … आता भारतात आलो की पहिले बघणार …
शेवटचे एकदा निळूभाऊ पडदयावर बघायास मिळतील… 😦
By: rohan on 15 सप्टेंबर, 2009
at 4:19 pm
mala ha chitrapat kharach khup avadla,shetkaryache jwalant prashna ya madhye kharach thalak pane mandle ahet.sarvani bhumika hi changlya bajavlya ahet,pan ase cineme nighun tari aple sarakar tya kade kiti dolas pane pahnar ha mudda mahatwacha..mala mhanayche ahe ki chitrapatane janjagruti hote,pan ti kiti kal tikate,hya prashnavar nemaka upay shodane..kharech garajeche ahe.baki chitrapat dolyat pani ubha karanara ahe.
By: jyoti Birje on 15 मे, 2010
at 5:41 pm
yes i like this movies
By: pratik on 16 मे, 2010
at 1:26 pm
lay bhariiiiiiiiiiiii
ekdam sholllleeeet~~~~~~~~~~~~~~~~~~
By: swapnil on 16 मार्च, 2011
at 6:41 pm
Makarand is really very talented person, excellent direction is there & no word for dialogues. Nilu Phule,Makarand, Nagesh & Sayaji all them are feel actor for marathi film they can do same to same acting for this type of story. I like the concept of movie. I also cried at the end of movie n have seen 2 times in 2 days. Thanks all of them & There team……
By: Harshad Karjekar on 14 डिसेंबर, 2011
at 8:04 pm
yes i like this movies and Makarand is really very talented person
By: RD on 22 जून, 2014
at 1:00 pm