Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 22 मार्च, 2010

खिंड


हॉल क्रमांक पाच.
वरीष्ठ महाविद्यालयाचा परीक्षा
पेपर इंग्रजीचा.
मास्तरानं प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका वाटल्या.


पहिला तास सहज निघून जातो.
सो-सो, विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या हालचाली.
मास्तर कॉप्या काढून घेतात.


वर्गात थोडीशी हालचाल.
पुन्हा नियमितपणे प्रोसेस सुरु.

शेवटची पाच मिनिटे.
एका पोरानं चौथ्यांदा कागदं काढली.
मास्तरानं पुन्हा त्या चिठ्ठ्या जमा केल्या.
आणि आता उत्तरपत्रिकाही घेतली.

सर, उत्तरपत्रिका द्या ना !
सर, उत्तरपत्रिका द्या ना !

‘‘तुझ्या कितीदा नकला घ्यायच्या”
‘‘सर, सर्वच पोरं नकला करतात.
मी केल्या तर काय चुकलं ?”

‘‘उत्तरपत्रिका मिळणार नाही.
आता वेळही संपत आली आहे”

‘‘सर, उत्तर पत्रिका द्या ना …!”

वेळ संपली.
मास्तर, उत्तर पत्रिका जमा करतात.

‘‘सर, उत्तरपत्रिका देणार का?”
‘‘नाही”
‘‘मी इमारतीवरुन उडी मारेन.”

पहिल्या मजल्यावरील
गज नसलेल्या खिडकीकडे त्याची धाव
मास्तर त्याला मिठीत घट्ट पकडतात.

कॉलेजचीच पोरं ती…
पोरा-पोरींचा गदारोळ.

‘‘सर सोडा त्याला तो मरणार नाही”
‘‘मरु द्या”
‘‘सर, किती घाबरतात नै”
‘‘सर, पेपरातल्या बातम्या वाचून आलाय तो”

मास्तरानं पोराला पेपर देण्याचं
खोटं आश्वासन दिलं.
गप्पात रंगवून ठेवलं.

तो पर्यंत पोराचा राग उतरलेला.
‘‘सर, चूक झाली.
असं पुन्हा करणार नाही,
रागाच्या भरात वाहून गेलो”

मास्तरानं वरवर हिम्मत दाखवली तरी,
नोकरीच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच,
मास्तराची खिंडीतून सुटका झाली.


प्रतिसाद

  1. नमस्कार,
    फार छान लिहीलंय.
    खूपच “टच्ची” वाटलं.विद्यार्थ्याची आणि मास्तराची पण कींव आली.

  2. आचरट कार्टी. प्रसंग बाकी बाका होता..तुम्ही चांगली शक्कल लढवलीत.

  3. वा मस्त लिहिले आहे. आवडले! अजून यायला हवेत हे किस्से!

    आपला फॅन
    गुंडोपंत


यावर आपले मत नोंदवा

प्रवर्ग