Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 26 ऑगस्ट, 2012

एका अफवेची गोष्ट

मोबाइलची रिंग वाजत होती. मोबाइलच्या कोप-यात पाहिलं. पहाटेचे तीन वाजत होते. साखरझोप होती. मला रात्री किंवा भल्या पहाटे फोन आला की काही तरी वाईट बातमी आहे, असे वाटायला लागतं.कोणाचा तरी अपघात झाला आहे किंवा कोणीतरी देवाघरी गेलंय, अशा बातमीत नाव कोणाचं असेल अशा काळजीनं वेढलेलं असतं. जवळचीच माणसं अशा अवेळी फोन करतात. आत्ताही हीच अवस्था होती. मोबाइलवर मेहुणीचं नाव दिसलं. माझ्या मनात ’सासरे ’ चमकून गेले. माझे सासरे अधून मधून आजारी असतात. एकदा तर इतके आजारी होते की मी हिला शेवटची भेट म्हणून पाठवलं होतं. पण सासरे पुन्हा हिंडा-फिरायला लागले.

”हॅलो जिजु की नै ? ”(इथं तर पक्की खात्री झाली)

”बोल”

”की नै, फोन याच्यासाठी केला. आमची सगळी गल्ली आता जागी झाली आहे.”

”मग झोपा ना सगळे.” माझ्यातला मिश्किल माणूस जागा झाला होता.

”तसं नाही ना जिजा. तुम्हाला याच्यासाठी फोन केला. घरात सगळे जे जे झोपले आहेत त्या त्या सर्वांना उठवून बसवा.”

माझ्या मनात विचार आला. हिच्या डोक्यावर काही परिणाम तर झाला नसेल. किंवा अर्धवट झोपेत माझा फोन नंबर डायल केला आणि आता काही च्या काही बरळत आहे.

”सर्वांना कशासाठी उठवून बसवू. आता पहाटेचे तीन वाजत आहेत. थोड्या वेळाने झाडझूड स्वयंपाक-पाणी सुरू होईल. दिवसभर बिचा-या मरमर करत असतात आता झोपू दे सर्वांना.”

”तुम्ही कधी कधी काही गोष्टी सीरियसली घेत चला.” मी कोणत्याच गोष्टी सीरियसली घेत नाही, याच्यावर हा शिक्कामोर्तब होता.

”जिजा, सगळ्यांना उठवून बसवा. मानमोडीचा आजार आला आहे. आत्ताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता तिच्या मैत्रिणीच्या मैत्रिणीचे वडील झोपेत गेले.”

”अगं तिचे वडील आजारी असतील.हार्टटॅक आला असेल किंवा अन्य कोणत्या कारणानं तसं झालं असेल.”

”शिल्पाकडं फोन द्या.”

”झोपू दे तिला.”

”अहो, एकदा सगळ्यांना उठवून बसवा. झोपेतच हा आजार येत असतो. आमची सगळी गल्ली जागी झाली आहे. गल्लीतल्या बायका महादेवाला नैवैद्य घेऊन चालल्या आहेत.”

मला आता हसू आवरेना. ”बरं बरं म्हटलं” आणि फोन चार्जिंगला लावून दिला. अंगावर दुलई घेतली आणि पुन्हा आता डोळे कसे लागतील या विवंचनेत पडलो. एकदा झोप मोडली की विचार चक्र सुरू होतं आणि मग डोळे लवकर लागत नाही. विचारांची डिस्क रिकामी झाली की मग कुठे पुन्हा डोळा लागतो.

पडल्या पडल्या मनात कॅसेट सुरू झाली. ’मानमोडी ’ या आजाराबद्दल आजी सांगायची. मान डावीकडे झुकली किंवा उजवीकडे झुकली की माणूस कायमचा मान टाकायचा. एकाला पोहचवलं की दुस-याला पोहचावं लागायचं म्हणे. आता माझ्याच मनात विचारचक्र जोरात सुरू झालं खरंच असं झालं तर..

मी उठलो. जिन्याने जिथे आई वडील झोपले होते तिथलं दार ठोठावलं. इतक्या पहाटे मी उठलो म्हणून आई तर प्रचंड घाबरली. वडीलही जागे झाले. मी झाला प्रसंग वडीलांना सांगितला. वडील हसू लागले. ”अरे, तू प्राध्यापक आहेस. तू अशा गोष्टीवर विश्वास ठेवतोस.” मी म्हणालो ”तसं कोणाला उठवलं नाही पण रिस्क नको म्हणुन आई-वडिलांच्या प्रेमापोटी तुम्हाला उठवलं” आम्ही घरातले सर्वच जागे झालो. गप्पा टप्पा सुरू झाल्या.

गप्पा टप्पा सुरू होत्या. माझा पुन्हा फोन वाजला एव्हाना पहाटेचे साडेतीन झाले होते. लहान्या भावाच्या सास-याच्या फोन होता. मीच फोन उचलला.

”नमस्कार”

”नमस्कार”

”आत्ताच मला कोपरगाववरुन फोन आला होता. तुम्ही एकदा घरातल्या सर्वांना जागे करा. कारण भूकंप होत आहेत. आत्ताच पंढरपूर गाव भूकंपात बसलं म्हणे”

आम्ही घरातले सर्व खो खो खो हसू लागलो. पाहुणे ओशाळले. त्यांनी फोन बंद केला. अजूनही दोन फोन वाजले तेही आमची काळजी घेण्यासाठी आले होते. कोण्या एका गावात काही लोकांना कायमचे पंगुत्व आले होते तर काही गावात देवाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले होते आणि तिकडे नवस सायासही सुरू झाले होते.

Advertisements

Responses

 1. हा हा अशा बऱ्याच अफवा पसरत असतात अधून मधून. सगळ्यात लेटेस्ट ऐकलेली उत्तर भारतात झोपलेल्या माणसांचे दगड होत आहेत अशी काहीतरी होती… छान लेख

  • ”झोपलेल्या माणसांचे दगड होत आहेत” हाहाहा काय हिम्मत आहे झोपण्याची असं कोणी सांगितल्यावर. 🙂

   प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार.

 2. प्रा डॉ
  मस्तच
  अफवा बर्याचदा त्रासदायक असतात तर कधी त्या धमाल उडवून देतात.
  तुमच्या लेखातून त्याची प्रचीती आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: