Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 11 मे, 2013

मेरा अपना तजुर्बा है, तुम्हे बतला रहा हु मै

डॉ.कुमार विश्वास.

गेल्या वर्षी लोकपाल विधेयकाच्या निमित्तानं दिल्लीत मोठं आंदोलन सुरु होतं. श्री अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल,किरण बेदी आणि अन्य मंडळींच्या आंदोलनाला लोकांनी प्रचंड अशा संखेनं पाठींबा दिला. एक प्रचंड उत्साह त्यावेळेस दिसला होता. अगदी स्वांतंत्र्याचा लढा आम्हाला प्रत्यक्ष पाहता आला नाही, पण तसंच वाटावं असं भारावून गेलेलं वातावरण होतं, असं अनेक लोक बोलत होते. माध्यमांची दिवसभर क्षणाक्षणाची रिपोर्टींग सुरु असायची. नेत्यांच्या भेटीगाठी स्टेटमेंट्स यांची ब्रेकींग न्युज चाललेली असायची. आणि या आंदोलनाच्या निमित्तानं एक चेहरा विविध वाहिन्यांवर झळकत असायचा. दुपारच्या वेळी मुख्य आंदोलनकर्ते जेव्हा आराम करत असायचे तेव्हा एक तरुण त्या माईकचा ताबा घ्यायचा आणि त्या गर्दीला सांभाळायचा ते मला आवडायचे ते नाव म्हणजे डॉ.कुमार विश्वास.

कुमार विश्वास या माणसाला मी कधी भेटलो नाही पण भेटण्याची संधी मिळाली तर नक्कीच भेटेन. काही माणसं आपल्याला उगाच आवडत असतात. आपल्याला त्यांच बोलणं आवडतं, त्यांचं नुसतं दिसणं आवडतं आणि आपण त्यांच्या प्रेमात पडतो. प्रेम कोणतंही असो, ते आंधळं असतं आपली फसगत होते तरीही आपल्याला अक्कल येत नाही. आपण पुन्हा तिच्या/त्याच्या आठवणीत गुंतून जातो. लोक काय म्हणतात त्याचा विचार करत नाही. कुमार विश्वास यांचे मी अनेक व्हिडियो आज दिवसभर पाहिले प्रत्येक कार्यक्रमात तो आपली आवडती कविता म्हणतो आणि रसिकांच्या काळजांचा ठाव घेतो. अतिशय गोड वाटतं त्याची कविता ऐकतांना. आपण कधी प्रेम केलं असेल, आपण प्रेमात पडला असाल, रडला असाल तर तुम्हाला कुमार विश्वास यांच्या आवाजातील ही गोड कविता नक्कीच आवडेल. असं वाटतं ( इथे ऐका )

कोयी दिवाना कहता है, कोयी पागल समजता है,
मगर धरती की बेचैनी को, पागल समजता है
मै तुझसे दूर कैसा हू, तू मूझसे दूर कैसी है
ये तेरा दिल समजता है, या मेरा दिल समजता है
के मोहबत एक एहसान की पावनसी कहानी है,
कभी कबिरा दिवाना था, कभी मीरा दिवानी है
यहा सब लोक कहते है, मेरी आखो मे आसू है
जो तु समजे तो मोती है, जो ना समझे तो पानी है
समंदर पीर का अन्दर है लेकीन रो नही सकता
ये आसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता.
मेरी चाहत को अपणा तु बना लेना मगर सून ले
जो मेरा हो नही पाया वो तेरा हो नही सकता
भवर कोयी कुमदनी पर मचल बैठा तो हंगामा
हमारे दिल मे कोयी ख्वाब पल बैठा तो हंगामा
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का
मै किस्से को हकिकत मे बदल बैठा तो हंगामा.

कुमार विश्वास यांच्या बद्दल मला फारशी माहिती नाही. तुनळीवर (कोणी लावला राव या शब्दाचा शोध) काही व्हिडियोंमधे हास्य कवी संमेलनात ते कविता म्हणतांना दिसतात. अभियंता आणि विद्यापीठात शिक्षक असल्याचे वाटते. विविध ठिकाणी त्यांचे स्टेज शो झालेले दिसतात. दिल्लीतल्या आंदोलनापूर्वीही त्यांचे आपले काही चाहते आहेत असेही दिसते. आपल्याकडून त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर वाचायला आवडेलच. एका व्हिडियोवरच्या दुव्यात ते असं म्हणतात की मला लोक विचारतात की तुम्ही आंदोलनात का सहभागी झालात तर ते म्हणतात जेव्हा माझी येणारी पिढी आणखी काही वर्षांनी विचारेल की माणसांना सामाजिक विषयावर जोडणारं एक आंदोलन झालं होतं, त्यात तुम्ही सहभागी होता का तर मी ताठ मानेनं म्हणेन की माझा सहभाग त्यात होता. अशा आशयाचं ते बोलतात. मला त्याची कविता आवडते, त्यांचं बोलणं आवडतं, एक भूमिका आवडते. हं आता काही कार्यक्रमात ते थोडा पांचटपणाही करतांना दिसतात. पण, एवढं तेवढं चालायचंच.

कुमार विश्वास यांची शैली अशी आहे की, दोन ओळी म्हणाच्या जरासा पॉज घ्यायचा, प्रेक्षकात काही हालचाल होत असेल तर त्यावर कमेंट्स करायच्या. बोलता बोलता उत्तरप्रदेश, राजस्थान, इथल्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख करायचा त्यावर विनोद करायचा. शिटी वाजवली तर त्यावर कमेंटस करायच्या. विद्यापीठातील अध्यापक कसे गंभीर असतात त्यावर बोलायचे, विद्यार्थी वस्तीगृहात पहिल्यांदा येतो तेव्हा खोबर्‍याच्या तेलाची बाटली वगैरे अमूक अमूक घेऊन येतो नंतर त्याच्याकडे कशा वेगवेगळ्या बाटल्या सापडतात त्यावर कमेंटस करत करत प्रेक्षकांना मनमुराद हसवायचे अशी ती शैली आहे आणि मधेच मग निवेदन करता हू, आपको इस कविताकी चार लायने पसंद आयेगी. आणि मग तरुणांना आवडेल अशा दोन ओळींची निवड करायची. अर्थात जालावर याच शैलीतल्या म्हणजे तो कोणत्याही ओळी म्हणतांना एकच अशी शैली निवडतो असे दिसते. विनोदाची पेरणी करायची आणि मग मग आता काही कवितेच्या ओळी म्हणणार आहे, आपल्याला त्या आवडणार आहेत. आणि जर आपल्याला त्या ओळी आवडल्या नाहीत तर मी शायरी सोडून देईन. (सर्वच ठीकाणी हाच फॉर्मुला)

मेरा अपना तजुर्बा है, तुम्हे बतला रहा हु मै
कोयी लब छु गया था तब, के अब तक गा रहा हु मै.

आणि एकदा प्रेक्षकांची दाद मिळाली की मग पुन्हा मग मै आपके सामने कुछ कविताये पेश करता हू लेकीन कविताए के बारे मे लोग कहते है की आप प्रेमकीही कविता क्यो सुनाते हो. कुछ सामाजिक देश के बारे मे क्यु नही लिखते. मग तो म्हणतो, प्रेम हजारो साल पहले था, अब भी है, और कल भी रहेगा. पाकिस्तान तेरसट साल पहले नहीथा, आज है…………आणि मग पॉज घ्यायचा. पब्लिक खळखळून दाद देते. आपण महाविद्यालयात शिकत असतांना जिच्यावर प्रेम करतो ती काही वर्षांनी भेटते तेव्हा ती तिच्या मुलाला म्हणते देखो बेटा मामा…. वगैरे.

बिछड के तुमसे प्यार मे कैसे जिया जाये बिना तडपे
जो मै खुद ही नही समजा वही समजा रहा हू मै.

किसी फ़त्तर मे मूरत है
कोयी फत्तर की मूरत है

लो हम ने देखली दुनिया, जो इतनी खूबसूरत है
जमाना अपनी समझे पर मुझे अपनी खबर ये है
तुझे मेरी जरुरत है मुझे तेरी जरुरत है.

कार्यक्रम सादर करतांना एक सोबती असतो मला वाटतं तो कवी असावा आणि ते ठरवून प्रेक्षकांची करमणूक करतात आणि ते इतकं सहजपणे होतं की ते लक्षात येत नाही. . मधे मधे बोलून त्याच्या मुद्द्याला पकडून विनोद करतात युपीचं शाळेतील इंग्रजी कसं आहे, प्राचार्य बनना चाहीहे मै ओ क्यु नही बनता. प्राध्यापक सतत गंभीरच का असतात वगैरे यावर विनोद मारुन पुन्हा निवेदन करता हू–

मेरे जीने मे मरने मे तुम्हारा नाम आयेगा
मे सांसे रोक लू फीर भी यही इल्जाम आयेगा.
हर एक धडकन मे जब तुम हो तो फीर अपराध क्या मेरा
अगर राधा पुकारेगी तो फीर घनशाम आयेगा.

आपल्याला कुमारविश्वास यांच्य कविता आवडतील म्हणून हा प्रपंच….!!!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: