देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात
अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा.
दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो
मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो.
सिद्धेश्वरही तस तसा उदास होत जातो.
भर दिवसा मला आभाळ भरलेले नसतांना
वीजा चमकल्याचा अन् गडगडाटांचा भास होतो,
कोणताच आवाज पोहचत नाही तुला
काठावर स्पर्श करुन परत फिरणारी तू
समुद्रलाटेसारखी धडकत असते मला.
सृष्टीतले चैतन्य समजून घेतांना
पा-याचा तो पारदेश्वरही समजून घ्यावा लागतो.
एकाच खोडात वाढेला पिंपळ-लिंब अन
कुमारिकेचा भयान चेहरा मंत्र-तंत्र पुजा.
रुईच्या रोपट्याशी तिचा विवाह पाहतांना.
माणसाचा जन्म असा कसा गं कोणत्या श्रद्धेचा
स्वतःचे सर्व अस्तित्व विसरलेला..?
अन सखे,
माझा जीव हल्ली लागत नाही गं तिथे,
अघोरीपणाने ओढले जातोय जरासे रुमानी होतांना.
प्रतिक्रिया व्यक्त करा