विद्यापीठाच्या आवारातून तिच्यासोबत फिरतांना,
गुलमोहराची कुजबूज ऐकलीय मी….
झाडाखालून चालतांना,
तिच्या पैंजणाचा आवाज ऐकुन
फुलांनी केलेला वर्षाव पाहिलाय मी…
तिच्या गप्पात रंगुन जातांना
पान न पान, मोहरुन जातांना पाहिलंय मी….
आयुष्यभर साथ देण्याचं ठरलं असतांना
मधेच ती सोडून गेली,
तेव्हा……
गुलमोहराचं पान न पान गळतांना पाहिलंय मी….
सर जी ,खूपच छान ,तुमच्या कवितेत संगतीतला आठवणींचा पाऊस आठवतो………
By: संजय काळे(sk) on 9 नोव्हेंबर, 2021
at 12:39 pm