Posted by: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 4 ऑगस्ट, 2023

ना.धों.महानोर

पद्मश्री ना.धों.महानोर. मराठी साहित्यातील मोठं नाव. कविता, कादंबरी, नाटक, कथा. असे सर्वच वाड्मय प्रकार त्यांनी हाताळले. शिकत असताना गांधारी कादंबरी अभ्यासाला होती. ना.धों.महानोरांची ही पहिली ओळख. मग रानातल्या कविता, अजिंठा हे दीर्घ काव्य अनेकदा वाचून काढले आहे. पुढे, पावसाळी कवितांनीही वेड लावलं. शेती-मातीच्या कविता त्यांच्या वाचनात आल्या. जैत रे जैत, सर्जा, विदूषक, दोघी या चित्रपटातली गाणी कायम ओठावर रेंगाळत राहीली. आमच्या महाविद्यालया पासून त्यांचं पळसखेडा हे गाव जवळच आहे. अजिंठा डोंगर रांगा आणि जंगल सर्व हिरवेगार वनराईचा परिसर. ‘मी जगतो तेच लिहितो’ असे मानणारे कवी. ना.धों.महानोर यांचं व्यक्तिमत्त्व ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही संस्कृतीने घडलेले मनोहारी व्यक्तिमत्त्व. शेतकरी, गीतकार, माजी आमदार असलेले पण एक साधेपण जपलेलं व्यक्तिमत्त्व. दोन-तीन वेळेस भेटीचे योग आले. गप्पांची मैफिल जमली, एकदा गप्पा सुरू झाल्या की मग एकापाठोपाठ आठवणी सुरू व्हायच्या. साहित्य, साहित्य परिषदा, विधानपरिषदेतील अनुभव, राजकारण, साहित्य संमेलने. कितीतरी आठवणी. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, माजी मंत्री बाबुरावजी काळे यांच्या सोबतच्या आठवणी. गप्पा अशा उत्तरोत्तर रंगत जायच्या.

आमच्या अजिंठा शिक्षण संस्थेचे ते संचालकही होते, त्यामुळे संबंधही होतेच पण येणा-या प्रत्येकाशी ते इतके भरभरुन बोलायचे असे वाटावे की आपली आणि त्यांची खूप ओळख आहे. आठवणी सांगतांना, आई वडील दुस-याच्या शेतावर रोजंदारीने काम करायचे, मी सगळ्यात मोठा. चार भाऊ तीन बहिणी. चार-पाच मैल शाळेत जायचो. कवितेचं आणि नाटकाचं वेड शाळेत लागलं. जळगावला कॉलेजात गेलो तर वडिलांनी बोलावून घेतलं पुरे झालं शिक्षण. वडिलांनी घेतलेली शेती कायम करीत राहिलो. जगभर फिरलो पण पळसखेड़ा सोडले नाही.

आमच्या अजिंठा शिक्षण संस्थेचे ते संचालकही होते, त्यामुळे संबंधही होतेच पण येणा-या प्रत्येकाशी ते इतके भरभरुन बोलायचे असे वाटावे की आपली आणि त्यांची खूप ओळख आहे. आठवणी सांगतांना, आई वडील दुस-याच्या शेतावर रोजंदारीने काम करायचे, मी सगळ्यात मोठा. चार भाऊ तीन बहिणी. चार-पाच मैल शाळेत जायचो. कवितेचं आणि नाटकाचं वेड शाळेत लागलं. जळगावला कॉलेजात गेलो तर वडिलांनी बोलावून घेतलं पुरे झालं शिक्षण. वडिलांनी घेतलेली शेती कायम करीत राहिलो. जगभर फिरलो पण पळसखेड़ा सोडले नाही.

आजुबाजूच्या खेड्यात गावात राहिलो म्हणून निसर्ग शेती, याबरोबर माणसं त्यांची लोकगीतं यांची ओळख होत गेली आणि ते सगळं पाठ केलं वाचन केलं कविता वाचल्या शाहिरी, केशवसूत, मर्ढेकर समजून घेतले आणि मग आठ कविता रानातल्या लिहिल्या. आणि प्रतिष्ठाण मधे छापून आल्या. मग लिहित गेलो. ‘रानातल्या कवितांनी’ मोठं केलं आणि प्रसिद्धी मिळाली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी कविता ऐकल्या आणि ते कवी आणि कवितेच्या प्रेमात पडले. विधानपरिषदेची संधीही मिळाली.

ब्रिटिश इष्ट इंडिया कंपनीच्या मिल्ट्रीत असलेल्या रॉबर्ट गील आणि पारोच्या परिसरातील आठवणी कायम सांगत आणि अजिंठा दीर्घकाव्य त्यामुळेच कसे लिहिते झालो. लता मंगेशकर भेटायला आल्या आणि तेव्हा त्यांना शेतातले सिताफळ आवडले आणि पुढे त्यांनी आपल्या शेतातील सीताफळाना ‘लताफळ’ नाव दिल्याची आठवण सांगत राहिले.

यशवंतराव चव्हाण साहेब, शरद पवार साहेब, सोयगावचे स्वांतंत्र्य सैनिक माजी मंत्री अप्पासाहेब काळे यांच्याबरोबरच्या आठवणी, या सर्व मोठ्या माणसाच्या सहवासात जीवनात नैतिकमूल्य जोपासता आली शिकता आले आणि ती माणसे मोठी का आहेत हे समजत गेले.

सोयगाव येथील श्रीराम संगीत मंडळ आणि लोटू पाटलांच्याबद्दल खूप बोलायचे. सोयगाव ला एक मोठं नाट्यगृह झालं पाहिजे असे ते म्हणायचे. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात सांस्कृतिक सभागृह आम्ही कसे आणले. तसेच मराठवाङा साहित्य परिषदेचा अध्यक्ष असतांना कसे काम केले. भरभरून बोलत असायचे. एकदा साहित्य संमेलनात हजर राहिले तर याद राखा म्हणून मिळालेली धमकी आणि आजारी असतांनाही मी गेलो ते सांगायचेच, राजकारण. साहित्य एकमेकात गुंतल्यामुळे झालेले फायदे तोटे सांगतांना कायम रमून जात असायचे.

आता केवळ आठवणी.


यावर आपले मत नोंदवा

प्रवर्ग